अंबाजोगाई / प्रतिनिधी : गेल्या चार वर्षांपासून पाऊसाने दडी मारल्यामुळे अंबाजोगाई तालुका दुष्काळाने होरपळत आहे. लोकांना प्यायला पाणी मोठ्या मुश्किलीने मिळत आहे. चार वर्षांपूर्वी पिण्याच्या पाण्याची अशीच दैनावस्था अंबाजोगाई शहरामधील सरकारी दवाखान्यात उपचारासाठी आलेले रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांची होती. त्यांना बाटलीभर पिण्याच्या पाण्यासाठी २० रुपये मोजावे लागायचे. पैसे देऊनही प्यायला स्वच्छ पाणी मिळायचे नाही. यामुळे पेशंट व त्यांचे नातेवाईक परेशान असायचे. ही बाब या भागात प्रवासी वाहतूक करणाऱ्या रिक्षाचालकांच्या 7020158561 निदर्शनास आली आणि यांच्या रिक्षा चालक व मालक संघटनेने या विषयी काहीतरी करायचे असे ठरवले. लागलीच या सर्वांनी दवाखान्याच्या प्रवेशद्वाराजवळ मोफत पिण्याचे पाणी जारद्वारे वाटायला चालू केले. हा आगळा वेगळा उपक्रम गेल्या चार वर्षांपूर्वी अवघ्या ५५ रिक्षाचालकांनी सुरु केला होता तो त्यांनी आजतागायत अविरतपणे चालूच ठेवला आहे. हा समाजउपयोगी उपक्रम दवाखाना ऑटो पॉईंट, मेडिकल परिसर येथील ऑटो चालक व मालक संघटनेचे ५५ रिक्षाचालक चालवत आहेत. या कौतुकास्पद उपक्रमाचा लाभ अनेक गरजू लोकांना होत आहे.
अंबाजोगाई शहरातील ऑटोवाले बनले मोफत पिण्याचे पाणीवाले; गेल्या चार वर्षांपासून दवाखाना ऑटो पॉईंट मेडिकल परिसरचा अनोखा उपक्रम का विसर अपलोग