ना. राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्या हस्ते रक्तदात्यांना मास्क व सॅनिटायझरचे वितरण कुरुंदवाड दि. १० (वार्ताहर) - येथील राष्ट्र सेवा क्रीडा मंडळ, साने गुरुजी विद्यालय, शिरोळ तालुका मुख्याध्यापक व शिक्षक शिक्षकेतर संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच कोल्हापूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, छत्रपती प्रमिला राजे हॉस्पिटल रक्तपेढीच्या सहकार्याने येथील साने गुरुजी विद्यालयात घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात ८४ महिला व पुरुषांनी रक्तदान केले. रक्तदात्यांना राज्याचे आरोग्य राज्यमंत्री ना, राजेंद्र पाटील- यड्रावकर यांच्या हस्ते मास्क व स निट ाय झर च वितरण करण्यात आले. कोरोनाव्हायरसमुळे राज्यात रुग्णांच्या संख्येत मोठया प्रमाणात वाढ होत असल्याने रक्ताचा तुटवडा होऊ नये म्हणून राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून येथील राष्ट्र सेवा क्रीडा मंडळाचे संस्थापक नगरसेवक जवाहर पाटील, साने गुरुजी शिक्षण संस्थेचे चेअरमन माजी नगराध्यक्ष रावसाहेब पाटील, राज्य विनाअनुदान कृती समितीचे उपाध्यक्ष खंडेराव जगदाळे, तालुका मुख्याध्यापक संघ संघाचे अध्यक्षा रोहिणी निर्मळे, तालुका शिक्षकेतर संघाचे अध्यक्ष संजय पाटील, रोटरी क्लबचे अध्यक्ष सुभाष जांभळे यांच्यावतीने व कोल्हापूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, छत्रपती प्रमिलाराजे हॉस्पिटलचे वैद्यकीय अधिकारी डॉ, संजय टुकड़े डॉ. पूजा पाटील यांच्या सहकार्याने येथील साने गुरुजी विद्यालयात रक्तदान शिबिर आयोजित केले होते, या शिबिरात ६९ पुरुष व १५ महिलांनी रक्त दान केले. या शिबिराला राज्याचे आरोग्य राज्यमंत्री ना, राजेंद्र पाटील- यड्रावकर यांनी भेट दिली. यावेळी त्यांच्या हस्ते रक्त दात्यांना व मास्क सॅनिटायझरचे वितरण करण्यात आले. यावेळी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी निखिल जाधव, साने गुरुजी शिक्षण संस्थेचे चेअरमन रावसाहेब पाटील, राज्य विनाअनुदान कृती समितीचे उपाध्यक्ष खंडेराव जगदाळे, नगर सेवक जवाहर पाटील, मुख्याध्यापक पी,डी, कदम पर्यवेक्षिका सौ माणिक नागावे, प्रसाद कुलकर्णी उपस्थित होते. या शिबिरासाठी संस्थेचे सचिव अजित पाटील, माजी नगरसेवक अभिजीत पाटील , प्रकाश मोहिते, सुभाष कोळेकर, शरद तावदारे,शांतगोंड पाटील, बसवराज कोळी, अशोक निर्मळे, गणपतराव सावगावे, प्रशांत सरवदे, शर्मिला पाटील, अमोलकुमार पाटील, राजू बडगिरे, सोमनाथ सुतार ,आशिष मग दूम, अनिकेतनन पाटील, प्रदीप पाटील, दत्तात्रय कुलकर्णी, शामराव गायकवाड, यांनी अथक प्रश्न परिश्रम घेतले.
ना. राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्या हस्ते रक्तदात्यांना मास्क व सॅनिटायझरचे वितरण