ओळखून इचलकरंजी विधानसभा इचलकरंजी दि. १० (वार्ताहर) - करोनाच्या पार्श्वभूमीवर शहरात उद्भवलेल्या परिस्थितीची गरज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष तथा नगरपरिषदेचे बांधकाम सभापती नितीन जांभळे यांनी लोकप्रतिनिधीचे कर्तव्य पार पाडत वाढदिवसाच्या खर्चाला फाटा देत आपल्या चार प्रभागातील नागरिकांना मोफत भाजीपाला वाटण्यात आला, माजी आमदार अशोकराव जांभळे, नगरसेविका सौ, कलावती जांभळे यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला, सध्या कोनाच्या प्रादुर्भावामुळे शहर आणि परिसरातील ल वस्त्रोद्योगासह सर्व उद्योग, व्यवसाय बंद ठेवण्यात आले आहेत. इचलकरंजी हे वस्त्रोद्योगाचे प्रमुख केंद्र असल्याने याठिकाणी कामगार, झोपडपट्टीधारकांसह उदरनिर्वाहाच्या निमित्ताने आलेल्या विविध राज्यातील कामगारांची संख्या लक्षणीय आहे. लॉकडाऊनमुळे असलेल्या कामगाराची अन्नावाचून आबाळ होत आहे. ही परिस्थिती व गरज ओळखून नगरसेवक नितीन जांभळे यांनी आपला वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला, वाढ दिवसाला होणाऱ्या खर्चाला फाटा देत आपल्या प्रभाग क्रमांक ५, ६ आणि ८ मधील जवाहरनगर, विकासनगर, गणेशनगर, आंबेडकरनगर, दत्तनगर, धनगरमाळ, कृष्णानगर भागातील नागरिकांना भाजीपाला वाटण्यात आला, त्यामध्ये जवळपास ६ हजार नागरिकांना त्याचे वाटप करण्यात आले, नितीन जांभळे युवामंचच्या वतीने लॉकडाऊनमुळे सर्व नियमांचे पालन करुन नेटके नियोजन करण्यात आले होते.
वाढदिवसाच्या खर्चाला फाटा देत नितीन जांभळे यांचेकडून नागरिकांना मोफत भाजीपाला वाटप