weight कमी करण्यासाठी प्रथिनयुक्त पदार्थ खाण्याचा सल्ला दिला जातो. या प्रक्रियेत कर्बोदकांचं प्रमाण कमी केलं जातं. मात्र कर्बोदकांमुळे शरीराला ऊर्जा मिळत असल्याने प्रथिनं आणि कर्बोदकांचा समतोल साधला जाणं गरजेचं आहे. प्रथिनांसोबतच कर्बोदकांच्या सेवनाने वजन कमी होण्यास मदत होते. प्रथिनं आणि कर्बोदकांचा समतोल कसा साधायचा, याविषयी... * चिकनमध्ये भरपूर प्रथिनं असतात. चिकन उकडून, भाजून किंवा ग्रील करून खाता येतं. चिकन शिजवताना लाल तिखट घातल्याने शरीराला कर्बोदकं मिळू शकतील. १०० ग्रॅम । लाल तिखटात ५० ग्रॅम कर्बोदकं आणि ३५ ग्रॅम डाएटरी फायबर असतं. यामुळे प्रथिनं आणि कर्बोदकं यांचा समतोल साधता येतो. * कर्बोदकं आणि क जीवनसत्त्वाने समृद्ध भोपळी मिरची आणि प्रथिनयुक्त अंडं यांचं एकत्रित सेवन करता येईल. अंड्यामुळे चयापचय क्रिया सुधारते तर भोपळी मिरची चरबी । कमी करण्याचं काम करते. जेवणात आमटी आणि पोळी खाता येईल. ओटमील, पेरु आणि कठीण कवचाची फळं एकत्र खाता येतील.
प्रथिनांसह कर्बोदकांचं प्रमाण